Sunday 27 May 2007

एकदाच ...

एकदाच व्यक्त होऊ देत
तुझ्या मनातील भावनांना
पुन्हा नाही जन्म देणार
मी कोणत्याच वेदनांना


याचना नाही पुन्हा कधी
तू असावीस सावली माझी
नाही आस ह्या वृक्षाची
फुटावी एक पालवी ताजी


नको तुझ्या मार्गाचा
अडथळा होणं आता
नको अश्रूंची वाढती संख्या
विनाकारण येता जाता


ह्या नात्याला नाव देणं
शेवटी तुझ्याच हाती आहे
नावा असेल तरचं जगास
रुचली नाती आहेते

मन उधाण वाऱ्याचे

मन उधाण वाऱ्याचे

आकाशी स्वप्नांच्या हरपुन पान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते,
सावरते बावरते झडते अडखळते का पडते..
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते..
मन तरंग होउन पाण्यावरती फ़िरते..
अन क्षणात फिरूनी अभाळाला भीडते..

मन उधाण वाऱ्याचे...

रुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते..
कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते..
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते..
भाबडे तरी भासांच्या मागुन पळते..

मन उधाण वाऱ्याचे..


चित्रपट : अगं बाई अरेच्च्या !!
संगीत : अजय अतुल
शब्द् : .....

संदीप खरे - २

बर झालं


या जमिनीत ,एकदा स्व:तला गाडून घेइन म्हणतो.....
चार दोन पावसाळे बरसुन गेले
की रानातल झाड बनून
परत एकदा बाहेर येइन ..
म्हणज़े मग मझ्या
झाडावरच्या पानापानातुन ,देठादेठावर,
फ़ांदीफ़ांदीला मीच असेन.
येणारे जाणारे क्षणभर थबकून, सुस्कारत म्हणतील -
"बर झालं हे झाड इथे आला !!!
अगदीच काही नसण्यापेक्षा.!!"

आणि पानापानातून माझे चेहेरे , त्यांना नकळत न्याहळत खुद्कन हसतील...
माझ्या पानांतुन वाट काढणार्‍या सुर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळुक श्वास्,
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देइन..
त्यांच्या घामाचे ओघळ माझ्यासावलीत सुकताना हळुच म्हणेन -
" बर झाल मी झाड झालो.
अगदिच काही नसण्यापेक्षा...!"

माझ्या अंगाखांद्यावर
आत्तापर्यत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं
आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यावर झोके घेतील....
त्यांचि वसंतांची गाणी उडत माझ्याकानी येतिल...
ति म्हणतील -
"बर झाल हे झाड इथे आला.
नाहीतर सगळा रखरखाटच होता !!!
याच जागी आपल्यामागे लागलेला तो वेडा कवी कुठे गेला.
मी पान सळसळवत कुज़बुजीन-
"बर झाल मी झाड झालो...
वेडा कवी होण्यापेक्षा."
आणखी काहि वर्षानी
मी सापडत नसल्याचा शोध
कदाचित, कोणालातरी लागेलही......
एखाद्या बेवारस, कुठल्याही.....
पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे
ते माझ्यानावाने अश्रु ढाळतील.
माझि वेडी गाणी आठवत
कोणी दोन थेंब अधिक टाकेल.
आणि...
माझ्याच चितेच्या लाकडासाठी
माझ्याचभोवती गोळा होत
घाव टाकता टाकता ते म्हणतील -
"बर झाल हे झाड इथे आला..
अगदिच लांब जाण्यापेक्षा."

माज्यावरती 'कोणी मी', राख राख बनताना
धूर सोडत हळुच म्हणेन -

"बरं झालं मी झाड झालो
अगदीच कुजून मराण्यापेक्षा....."

बरं झालं मी झाड झालो

संदीप खरे

चुकली दिशा तरीही

चुकली दिशा तरीही , हुकले न श्रेय सारे
वेड्या मुशाफिरीला सामील सर्व तारे..

मी चालतो अखंड चालायचे म्हणून,
धुंदीत या गतीच्या सारेच पंथ प्यारे..

डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवाचे,
हे शीड तोड्ले की अनुकूल सर्व वारे..

मग्रूर प्राक्तनाचा मी फाडीला नकाशा,
विझले तिथेच सारे ते मागचे इशारे..

चुकली दिशा तरीही आकाश एक आहे,
हे जाणतो तयाला वाटेल तेथ न्यारे..

आशा तशी निराशा, हे श्रेय सावधांचे,
बेसावधास कैसे डसणार हे निखारे ?...

-- विंदा करंदीकर

Monday 14 May 2007

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

Saturday 12 May 2007

~ग्रेस.

शब्दांनी हरवुन जावे
क्षितिजांची मिटता ओळ
मी सांजफुलांची वेळ

वृक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चंद्रखुणांची
मी निळीसावळी वेल

गात्रांचे शिल्प निराळे
स्पर्शाचा तुटला गजरा
मी गतजन्मीची भूल

तू बावरलेला वारा
पायांत धुळीचे लोळ
मी भातुकलीचा खेळ.

~ग्रेस.


सहभाग - ओंकार तारे