Monday, 28 August 2006

माझ्या - मराठी कविता

हे संकेतस्थळ मी माझ्या आवड्त्या कविता.. माझ्या कवितांना तयार केले आहे. तुम्हीसुध्धा इथे तुमच्या आवड्त्या कविता देऊ शकता.. ही माझी पहिली कविता..

शेवटचा निरोप घेऊ नकोस,
फक्त "परत भेटू" म्हण..
कारण सखे..
आपण परत भेटायचं ..रोजंदारी शिकवत रहाते,
जगण्याचे नवे बहाणे..
अनेक शिड्या , अन अनेक घोडे,
वर नेऊ पहाणारे...
जीव तोडून आता एकदा
आभाळाला भिडायचं
कारण सखे..
आपण आता तिथेच भेटायचं..मी धूळ .. तू ही धूळ
शेवट नशीबी असते माती ..
का उगाचच मोडावी
तुझी नि माझी अक्षय मैत्री...
कधीतरी सोडून सारे ..
पूर्ण नभ व्यापायचं..
आता, तिथेच भेटायचं..ह्या कविता माझ्याच आहेत् आणि अजून वाचण्यासाठी हा दुवा पहा..

वीरेन्द्र