Tuesday 12 May 2009

कशासाठी अणि जगावे कसे मी ? |

कशासाठी अणि जगावे कसे मी ? |
विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी ||
जगू पांग फेडावया मायभुचे |
आम्ही मार्ग चालू जीजाऊ सुताचे ||

देहास मानूनी जगा नित पायपोस |
झुन्झा अखंड करण्या आपूला स्वदेश ||
होऊ नका चुकुर हे ह्रुद्गत कठुनी |
संदेश अन्तिम दिला शिवभुपतीनी ||

उरी ध्येय ज्वाला असे पेटलेली |
अशाना करी लागती ना मशाली ||
रवि नित्य तेवे विना तेलवात |
अशांची शिवाजी असे जन्मजात ||

संभाजी मंत्र तद्वत उरी ज्या शिवाजी |
मारेल मृत्यु वरही रणी नित्य बाजी ||
हे हिंदुराष्ट्र करण्या रविवत ज्वलंत |
हे बीजमंत्र भिनवू मनशोणितात ||

माघार ठावी न कधी आम्ही मातृभक्त |
राष्ट्रार्थ जीवन जगू शतधा विरक्त ||
चित्तात साठवू सदा शिवभुपतीस |

2 comments:

  1. माघार ठावी न कधी आम्ही मातृभक्त !
    राष्ट्रार्थ जीवन जगू शतधा विरक्त !
    चित्तात साठवू सदा शिवभुपतीस !
    काळास जिंकिल असा घडवू स्वदेश !

    रक्तांत बिंबवू उठा अरीसुडत्वेष !
    त्या वाचुनी न टिकतो कधीं ही स्वदेश !
    जळू गलीच्छ क्लिबवत अवघें विटाळ !
    राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवभूपजाळ !

    ReplyDelete