Saturday 7 October 2006

माझ्या - मराठी कविता

बरह संगणक प्रणालीचे मनापासून आभार !! आज मी कोणत्याही अड्चणीशिवाय हा ब्लोग लिहीला.

कविता १

पुनवेसारखा फुलतो,
माझ्या दारचा मोगरा..
मग तूही संध्याछाया बनून ,
माळतेस तुझ्या घनरात केसात ..
चांदण्यांचा गजरा..


कविता २

कविता सरली, सये
आता कविता सरली
क्षणभर लखलखलेली
वीज तमात विरली..



थेंबांचा शुभ्र कल्लोळ
नभामधेच विखुरला,
एकल्या वाटांवरी
वाराही नाही उरला..



फुटून गेले पानांवरले
थेंबांचे आरसे ..
आता फक्त, मनात उरले
मूक, पावसाचे ठ्से..


क्षण ते झरले .. गेले
नियतीने पलट्ली कूस
अश्रू रूपात.. बघ..
दाट्ला पाऊस

ह्या कविता माझ्याच आहेत् आणि अजून वाचण्यासाठी हा दुवा पहा..
वीरेन्द्र

No comments:

Post a Comment